Ramzan Month : पीएम मोदींनी दिल्या रमजानच्या शुभेच्छा म्हणाले,

पुढारी ऑनलाइन डेस्क : दिल्लीसह देशभरात आजपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला Ramzan Month सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी हा सण देशात एकता आणि बंधुत्व घेऊन येईल, अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी ट्विट करून देशवासीयांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, रमजानच्या निमित्ताने मी देशवासियांना शुभेच्छा देतो आणि या पवित्र महिन्याने समाजात एकता आणि बंधुभावाची भावना विकसित होवो अशी इच्छा व्यक्त करतो.
Best wishes on the start of Ramzan. pic.twitter.com/SJk5qNAIRm
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2023
Ramzan Month : रमजान का साजरा केला जातो?
इस्लाम धर्मानुसार रमजान महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास ठेवतात. यालाच रोजा ठेवणे असे म्हणतात. पहाटेच्या पहिल्या नमाजनंतर संध्याकाळच्या नमाजपर्यंत उपवास ठेवण्यात येतो. पहिल्या नमाजला फज्र नमाज म्हणतात. तर संध्याकाळच्या नमाजला मगरिब नमाज म्हणतात. फज्रची नमाज अदा करण्यापूर्वी सहरी करतात. त्यानंतर रोजा सुरू होतो. रोजा दरम्यान अन्न व जल ग्रहण केले जात नाही. हा पवित्र महिना साधारणपणे 29 किंवा 30 दिवसाचा असतो. चंद्र दिसण्यावर महिना किती दिवसाचा आहे हे ठरते.
Ramzan Month : इस्लाममध्ये रमजानचे महत्त्व काय आहे?
इस्लाम धर्मात रमजान महिन्याचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, या महिन्यात केलेल्या उपासनेने अल्लाह प्रसन्न होतो आणि उपवास करून मागितलेली प्रत्येक प्रार्थना स्वीकारली जाते. असे मानले जाते की रमजानमध्ये अनेक प्रार्थनांचे फळ इतर दिवसांच्या तुलनेत 70 पटीने जास्त असते.
हे ही वाचा :
Meta च्या कॅनडा ऑफिसमध्ये रुजू होताच ३ दिवसांतच नोकरीवरून काढले, भारतीय कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल