Meta च्या कॅनडा ऑफिसमध्ये रुजू होताच ३ दिवसांतच नोकरीवरून काढले, भारतीय कर्मचाऱ्याची पोस्ट व्हायरल

Meta layoffs : फेसबुकची मूळ कंपनी मेटामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु आहे. याचा फटका हजारो कर्मचाऱ्यांना बसला आहे. मेटाच्या कॅनडा येथील कार्यालयात रुजू झाल्यानंतर एका भारतीय तंत्रज्ञाला तीन दिवसांच्या आत नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्याच्यावर ओढावलेल्या या संकटाची माहिती त्याने LinkedIn वर पोस्ट करत शेअर केली आहे. नोकरकपातीच्या पहिल्या लाटेनंतर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने नमूद केले आहे की कॅनडामधील सोशल मीडिया फ्लॅटफॉर्ममध्ये रुजू झाल्यानंतर तीन दिवसांतच त्याला काढून टाकण्यात आले आहे.
”काल सकाळी मला कळले की मी ११ हजार कर्मचार्यांपैकी एक आहे ज्यांना Meta ने नोकरीवरून काढून टाकले आहे. आधी व्हिसाच्या प्रदीर्घ प्रक्रियेसाठी वाट पाहावी लागली. त्यानंतर तीन दिवसांपूर्वीच मी मेटामध्ये जॉईन झालो. पण तीन दिवसांनंतर लगेच जे काही घडले याचे खरोखरच वाईट वाटते.” या माजी मेटा कर्मचाऱ्याच्या लिंक्डइन पेजवरील अपडेटनुसार, तो आता भारतात परतला आहे आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून PhonePe मध्ये रुजू झाला आहे.
नोकरकपातीच्या दोन फेऱ्या
मेटाने पाच महिन्यांत नोकरकपातीच्या दोन फेऱ्या केल्या आहे. पहिल्या फेरीत फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी ११ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले आणि दुसऱ्या टप्प्यात कंपनीने आणखी १० हजार कर्मचाऱ्यांना घरी पाठवले. अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावल्यानंतर त्यांची व्यथा ट्विटर, लिंक्डइन आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मांडली आहे. (Meta layoffs) मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी २०२३ हे वर्ष “कार्यक्षमतेचे वर्ष” म्हणून घोषित केले आहे. मेटा त्यांचे कार्य सुव्यवस्थित करण्यावर लक्ष केंद्रित करेल, असे त्यांनी याआधी म्हटले होते.
हे ही वाचा :