पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगढ राज्यातील सुकमा जिल्ह्यातील कोट्टालेंद्र क्षेत्रातील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली. या कारवाईत ५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर ५ नक्षलवादी जखमी झाले आहेत. याबाबत सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी माहिती माध्यमांना दिली.
एसपी शर्मा म्हणाले की, गुरुवारी (दि.२२) त्यांना माहिती मिळाली की, नक्षलवादी कोंटा एरिया कमिटीचे पथक एराबोर पोलिस स्टेशन अंतर्गत गावातील कोट्टलेंद्र जंगलाजवळ आहेत. ते मोठा घातपात घडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग-३० वर येणार आहेत. सकाळी ११.३० च्या सुमारास कोट्टलेंद्र जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या कोन्टा एरिया कमिटी टीममध्ये चकमक सुरू झाली. चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी केलेल्या धाडसी कारवाईने नक्षलवादी जंगलत पळून गेले. दरम्यान, घटनास्थळी पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तर चार ते पाच नक्षलवादी जखमी झाले आहेत. पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा