बिल्कीस बानो प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय स्थापणार विशेष खंडपीठ | पुढारी

बिल्कीस बानो प्रकरणाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालय स्थापणार विशेष खंडपीठ

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : गुजरातमधील बिल्कीस बानो प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (दि.२२) घेतला. गुजरात दंगली दरम्यान बिल्कीस बानो नावाच्या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील लोकांची हत्या केल्याच्या घटनेतील ११ दोषींना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला होता. याला आक्षेप घेत बिल्कीसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.

बिल्कीस बानोच्या याचिकेवर विचार करण्यासाठी नवीन खंडपीठ स्थापन करणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद बिल्कीसच्या वकील शोभा गुप्ता यांनी केला. यावर विशेष खंडपीठ स्थापन केले जाईल, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारधीवाला आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button