दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्त कार्यालयाची सुरक्षा कमी केली; भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर | पुढारी

दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्त कार्यालयाची सुरक्षा कमी केली; भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : खलिस्तान समर्थकांनी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर मागील काही काळापासून हिंसाचार चालविलेला आहे. यासंदर्भात भारताकडून वारंवार सुरक्षा वाढविण्याची मागणी करूनही ब्रिटनने त्याकडे कानाडोळा केल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने जशास तशी भूमिका घेत दिल्लीतील ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालय व उच्चायुक्ताच्या निवासस्थानाचे सुरक्षा कवच कमी केले आहे.

ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालय तसेच उच्चायुक्ताच्या निवासस्थानासमोरील बॅरिकेड्स दिल्ली पोलिसांनी हटविले आहेत. हे बॅरिकेड्स म्हणजे सुरक्षा व्यवस्थेचा पहिला टप्पा मानला जातो. दरम्यान ब्रिटन वा अन्य कोणत्याही देशाच्या राजदूतावासाची सुरक्षा व्यवस्था कमी करण्यात आली नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटिश उच्चायुक्त कार्यालयाबाहेरील बंकर तसेच सदैव तैनात असलेले पोलिस व्हॅन हटविण्यात आले आहे. ब्रिटनला इशारा देण्याचा भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

हेही वाचा 

Back to top button