आता विदेशातील वकील भारतात करु शकणार प्रॅक्टिस : बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिली मंजुरी | पुढारी

आता विदेशातील वकील भारतात करु शकणार प्रॅक्टिस : बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिली मंजुरी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विदेशातील वकील आणि परदेशी कायदा संस्थांना  भारतात वकिली करता येणार आहे. यासंदर्भातील प्रस्‍तावास बार कौन्‍सिल ऑफ इंडियाने ( बीसीआय ) मंजुरी दिली आहे.

यासंदर्भात ‘बीसीआय’ने  म्हटले आहे की, ” या मुद्यावर आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. हे पाऊल भारतातील कायद्याच्या सरावावर परिणाम करणार नाही. भारतातील वकिलांच्या फायद्यासाठी परदेशी कायद्याच्या सराव, आंतरराष्ट्रीय कायदेशीर समस्या आणि आंतरराष्ट्रीय लवाद प्रकरणांमध्ये परदेशी वकिलांसाठी भारतात वकिलीस परवानगी दिल्‍याने भारतात कायदेशीर व्यवसाय विकसित करण्यास मदत होईल. ”

बार कौन्सिल ऑफ इंडियाचा सुरुवातीला विदेशी वकील आणि परदेशी कायदा संस्थांना भारतात कोणत्याही स्वरूपात प्रवेश देण्यास विरोध होता. मात्र २००७-२०१४ या वर्षांमध्‍ये बीसीआय, देशभरातील राज्य बार कौन्सिल आणि इतर भागधारक यांच्यातील संयुक्त सल्लागार परिषदांमध्ये परदेशी वकिलांसाठी भारतात कायद्याचा सराव सुरू करण्याच्या संभाव्यतावर चर्चा होत होती.

हेही वाचा : 

Back to top button