तरूणीचा चालत्‍या रेल्‍वेत ‘सामी सामी’ वर तुफान डान्स; सर्वांच्या नजरा मात्र ‘त्‍या’ वर बसलेल्‍या पोरावर (व्हिडिओ) | पुढारी

तरूणीचा चालत्‍या रेल्‍वेत 'सामी सामी' वर तुफान डान्स; सर्वांच्या नजरा मात्र 'त्‍या' वर बसलेल्‍या पोरावर (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन ; इंस्‍टाग्रामवर रील्‍सचा नाद लई डेंजर… होय लोकांच्या डोक्‍यात रील्‍सची नशा इतकी भिनलीय की काही बोलायच नाही. मग अशा रील्सबाज लोकांना रील्‍स बनवण्यासाठी रेल्‍वे, मेट्रो, विमान ऑटो रिक्षा हे म्‍हणजे हक्‍काचं व्यासपीठचं, मग काय बनवायचे रील्‍स अन् करायचे धडाधड व्हायरल. अशी ही अल्‍पावधीत प्रसिध्दीची नशा वाढतच चालल्‍याचं दिसून येत आहे. असाच एका तरूणीच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

एक तरूणी चालत्‍या रेल्‍वेत प्रवाशांनी गच्च भरलेल्‍या बोगित असा काही धमाकेदार डान्स करते. की इतर प्रवाशांच्या तीच्यावरून नजराच हटत नाहीत. तीच्या जोरदार डान्स स्‍टेप्स पाहून इतर प्रवासी सीटवरून उठून तीचा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करू लागतात. मात्र यावेळी सर्वांच्या नजरा खिळल्‍या त्‍या वरच्या सीटवर बसून तरूणीचा व्हिडिओ बनवणाऱ्या त्‍या लाल शर्टातल्‍या मुलावर.

हा व्हिडिओ पाहून कमेंट करणाऱ्या यूजर्सनी लिहिलंय की, लाल शर्ट मधला मुलगा फुल चिल्‍ल करतोय. एकजण म्‍हणतो मी रेल्‍वेत असतो, तर सारखा टॉयलेटला गेलोच नसतो. तर एकजण म्‍हणतो, तरूणीचा कॉन्फीडन्स एकदम भारी आहे. तर एक युजर्स लिहितो की, हिच्या ओव्हर ॲक्‍टिंगचे पैसे कट करा रे…

हा डान्सचा व्हिडिओ इंस्‍टाग्रामच्या @sahkajal66 वर पोस्‍ट करण्यात आला होता. जो आतापर्यंत धुमाकुळ घालत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल करताना कॅप्शनमध्ये रेल्‍वेत सामी-सामी लिहिलंय. आतापर्यंत या व्हिडिओला लाखांवर लाईक्‍स आणि लाखाे व्ह्यूज मिळाले आहेत. दरम्‍यान अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर भन्नाट कॉमेंट केल्‍या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by sahKajal. (@sahkajal66)

हेही वाचा : 

Back to top button