Medical Colleges : खाजगी रुग्णालयांनाही सुरु करता येतील वैद्यकीय महाविद्यालये; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती  | पुढारी

Medical Colleges : खाजगी रुग्णालयांनाही सुरु करता येतील वैद्यकीय महाविद्यालये; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती 

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील मोठे रुग्णालये आता स्वतःची वैद्यकीय महाविद्यालये सुरु करू शकतील. सोमवारी (दि. १३) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशातील ६२ मोठ्या रुग्णालयाचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते.मंत्रालयाने एमबीबीएसच्या जागा वाढवण्यासह परदेशात अभ्यास करण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी आरोग्य मंत्री मांडवीया यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात येण्याचे आवाहन प्रतिष्ठित खासगी रुग्णालयांना केले होते.
देशातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना देशातच वैद्यकीय शिक्षणासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करवून देण्यासह हे शिक्षण सर्वांच्या आवाक्यात यावे या अनुषंगाने केंद्राने तयारी सुरु केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून यावर्षी जवळपास दीड हजार अतिरिक्त वैद्यकीय जागा उपलब्ध होतील.
“मी देशातील डॉक्टरांना विदेशाऐवजी भारतात प्रशिक्षण देण्याच्या विचाराचा आहे”, असे मांडवीया यांनी सोमवारी सांगितले.नुकतीच लीलावती, अमृता रुग्णालय, मेदांता, ब्रीच कँडी तसेच कोकीलाबेन सह ६२ खासगी रुग्णालयासोबत चर्चा करीत वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचा आग्रह केल्याचे मांडवीया म्हणाले.किमान १५ ते २० रुग्णालये यंदा काही वैद्यकीय जागांसोबत सुरुवात करेल, असा विश्वास मांडवीया यांनी व्यक्त केला.
बैठकीत सत्य साई, जसलोक, अपोलो सारखे रुग्णालयाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण सुरु करण्याच्या अनुषंगाने विचार करणाऱ्या रुग्णालयांना वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जागा उपलब्ध करवून दिली जाईल तसेच कागदोपत्री प्रक्रियेच्या नियमातून सवलत दिली जाईल.
हेही वाचा

Back to top button