…म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात आली क्रांती : उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | पुढारी

...म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात आली क्रांती : उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : आमिर खान यांनी पाणी फाऊंडेशनची कल्पना मांडून शेतकऱ्यांमध्ये क्रांती आणली, त्यांच्या कार्यात त्यांनी त्यांच्या टीमने महत्वाचा सहभाग नोंदवल्यामुळे त्यांचे अभिनंदन ! वॉटर कपच्या माध्यमातून जल स्वयंपूर्ण गाव केल्यानंतर विषमुक्त आणि गटशेतीचे उत्कृष्ट मॉडेल तयार झाले आहे, असे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अमीर खान यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पाणी फाऊंडेशनचे संस्थापक चित्रपट अभिनेते अमीर खान, किरण राव, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ.अविनाश पोळ आदी उपस्थित होते.

यावेळी फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. 20 हजार गावात जलसंधरणाची कामं त्यावेळी झाली. यामध्ये 6 लाख स्ट्रक्चर तयार होऊन जलस्वयंपूर्ण गावे झाली आहेत. रासायनिक खतामुळे काळ्या आईत आपण विष पेरले आणि कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. म्हणून नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीचे मिशन ३००० कोटी खर्च करून 25 लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने करण्यावर भर दिला पाहिजे.

वातावरण बदलामुळे शेतीसमोर आव्हाने आहेत, अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीतून बाहेर पडण्यासाठी शाश्वत, विषमुक्त, नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढेल.  गटशेतीच्या नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होते. म्हणून नव्याने गटशेतीची योजना सुरू करणार आहोत. अडीच लाख शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम चालू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Back to top button