नागपूर : भाजप आमदारांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संघभूमीला भेट | पुढारी

नागपूर : भाजप आमदारांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संघभूमीला भेट

नागपूर; पुढारी ऑनलाईन : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित असलेल्या भाजपचे मंत्री, आमदारांनी आज (दि.२७) सकाळी संघभूमीतील डॉ. केशव हेडगेवार यांना अभिवादन केले. प्रतिवर्षी सर्व भाजपचे आमदार नागपूरला जाऊन हेडगेवार स्मृतिस्थळला नतमस्तक होत असतात. नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृतीभवन येथे भाजप नेत्यांनी डॉ. हेडगेवारांच्या स्मृतिस्थळला पुष्प अर्पित करून अभिवादन केले. यावेळी मंत्र्यांबरोबर आमदार, महिला आमदारही सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, एका बंद खोलीत ४५ मिनिटे संघाच्या पदाधिकारी व वरिष्ठ कार्यकर्त्यांनी संवाद साधून संघाच्या कार्याबाबत माहिती दिली. यावेळी संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून नागपूरमध्ये अधिवेशन असताना भाजपचे सर्व आमदार हेडगेवार स्मृतीभवनाला भेट देवून अभिवादन करतात. यावेळी प्रत्येकाचा परिचय देण्यात येतो, सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिहिलेलं ‘भविष्य का भारत’ पुस्तक यावेळी भेट देण्यात आल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

हे वचलंत का? 

Back to top button