नागपूर; पुढारी ऑनलाईन : यंदाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नागपूर येथील दसरा मेळाव्यात प्रथमच एका महिलेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे. संघाच्या इतिहासात प्रथमच असे घडणार आहे. गिर्यारोहक संतोष यादव यांना संघाच्या दसरा मेळावा दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची व मार्गदर्शन करण्याची संधी संघाने उपलब्ध करुन दिली आहे.
राज्यात दसरा मेळाव्याचे महत्त्व सर्वश्रुत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे तसेच महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे तो म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) दसरा मेळावा. नागपूर येथे संघाचा दरवर्षी दसऱ्याला मेळावा होतो. दरवर्षी पार पडणाऱ्या मेळाव्यात प्रथमच एका महिलेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान संघाचे सरचिटणीस दत्तात्रेय होसबळे संघटनेच्या (RSS) बैठकीत संघाच्या प्रत्येक उपक्रमात महिलांचा सहभाग तुलनेने फारच कमी असतो, अशी खंत यावेळी खंत केली. संघाकडून महिलांना डावलण्यात येते अशी टीका सर्रास केली जाते, या सर्व गोष्टींना फाटा देण्यासाठी व संघात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी यंदा प्रथमच गिर्यारोहक संतोष यादव यांच्या रुपाने एका महिलेला संघाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात निमंत्रण देण्यात आल्याचे होसबळे म्हणाले.
अधिक वाचा :