

पुढारी ऑनलाईन डेस्क : होळीच्या उत्सवादरम्यान एका जपानी महिला पर्टकाला भारतीय तरुणांकडून दिल्लीत त्रास देण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. अद्याप पीडित मुलीने दिल्ली पोलिसांकडे किंवा दूतावासात कोणतीही तक्रार/कॉल केलेला नाही. व्हिडिओमध्ये दिसत असलेली विदेशी महिला पर्यटक जपानची आहे. तिला त्रास देणाऱ्या तरुणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी घटनेची कबुली दिली आहे. वाचा सविस्तर माहिती. (Delhi Crime)
माहितीनुसार, हा व्हिडिओ दिल्लीमधील पहाड गंज परिसरातील आहे. काही तरुण एका विदेशी महिला पर्यटकाला "होली है"च्या गजरात तिच्यावर रंग लावताना दिसत आहेत. एक मुलगा तिच्या डोक्यावर अंडी फोडताना दिसत आहे. तिला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला तिने थप्पड मारली आहे. तिला एवढा रंग लावलेला की, तिला ओळखता येत नव्हते. तिला रंग लावताना तिची छेड काढण्याचा प्रयत्न केलाचा दिसत आहे. पोलिसांनी सांगितले की, तिला रंग लावून त्रास देणाऱ्यापैकी एक अल्पवयीन आहे. हे तिन्हीही आरोपी याच भागातील आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. त्या तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी केली जावू लागली. संबंधित पीडित मुलीने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केला होता. काही कालावधीनंतर तो व्हिडिओ तिने डिलीट केला होता. तोपर्यंत तिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.
पीडित जपानी महिला पर्यटकाने काल भारता सोडला असून ती सध्या बांगलादेशमध्ये आहे. "मुलीने ट्विट केले आहे की ती बांगलादेशात पोहोचली आहे आणि ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे,"
हेही वाचा