Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले…live Updates… | पुढारी

Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले...live Updates...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात गंभीर आरोपाखाली तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना आज रोझ अॅव्हेन्यू कोर्टासमोर हजर करण्यात आले.  सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात येणार आहे. दरम्यान ईडीने आज त्यांची किमान 10 दिवसांच्या कोठडीची मिळवण्याचा प्रयत्नात आहे.

न्यायालयात ईडीने मांडलेली बाजू :

अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयाला सांगितले की, उत्पादन शुल्क धोरण तयार करण्यामागे एक कट होता. हा कट विजय नायर यांच्यासह इतरांनी रचला होता आणि घाऊक विक्रेत्यांना असाधारण नफ्यासाठी उत्पादन शुल्क धोरण आणले होते.

अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली न्यायालयाला विजय नायर आणि के कविता (BRS MLC) यांच्यातील भेटीची माहिती दिली

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया(Manish Sisodia) यांना गेल्या महिन्यात २६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. विशेष सीबीआय न्यायाधीश एमके नागपाल यांनी सिसोदिया यांना 6 मार्चला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान त्यांची गुरुवारी (दि.९) तिहार तुरुंगात सक्तवसुली संचलनालयाने चौकशी केली. आज (दि.१०) देखील त्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार 20 मार्चपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. न्यायालयाने ईडीला सिसोदिया यांना आज दोन वाजता न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनिष सिसोदिया यांना आज कोर्टासमोर हजर करण्यात आले.

Manish Sisodia : काय आहेत आरोप 

मद्य धोरण घोटाळ्यातील सिसोदिया यांच्या भूमिकेचा ईडी तपास करीत आहे. वारंवार फोन बदलून पुरावे नष्ट करणे, मद्यविक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांचे कमिशन 5 टक्क्यांवरून वाढवून 12 टक्के करणे, या बदल्यात लाच घेणे, दक्षिण भारतातील मद्य कार्टेलकडून आप नेता विजय नायरच्या माध्यमातून पैसे घेणे याशिवाय मद्य धोरण बदलण्यातील त्यांच्या भूमिकेचा तपास सुरु आहे. घोटाळ्याची व्याप्ती आणि पैसा कसा आला, कसा गेला, या बाबींवर तपासाचा केंद्रबिंदू असल्याचे ईडी सूत्रांचे म्हणणे आहे.

२६ फेब्रुवारी रोजी अटक 

मनीष सिसोदिया यांना गेल्या महिन्यात २६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. विशेष सीबीआय न्यायाधीश एमके नागपाल यांनी सिसोदिया यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सीबीआयच्या वकिलांनी सांगितले होते की सिसोदिया यांच्या पुढील कोठडीची मागणी केली जात नाही, परंतु पुढील 15 दिवसांत गरज भासल्यास पुन्हा कोठडीची मागणी केली जाऊ शकते.

Manish Sisodia : सिसोदिया  अंडरट्रायल आरोपी 

मनीष सिसोदिया (51) यांना तिहारच्या तुरुंग क्रमांक 1 च्या वॉर्ड क्रमांक 9 मध्ये ठेवण्यात आले आहे. हा ज्येष्ठ नागरिक वॉर्ड असून, तेथे सीसीटीव्हीद्वारेही त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. केजरीवाल सरकारमध्ये मंत्री राहिलेले सत्येंद्र जैन हेही या प्रभागात ७ व्या क्रमांकात आहेत. सिसोदिया हे अंडर ट्रायल आरोपी आहेत, त्यामुळे ते जेलमधून त्यांच्या सोयीनुसार कपडे घालू शकतात. त्यांना तुरुंगातूनच काही कपडे देण्यात आले. त्याचबरोबर सिसोदिया यांना मेडिटेशन सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. कारागृहात त्यांच्यासोबत डायरी, पेन, भगवतगीता आणि चष्मा ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.

11 मार्च रोजी कविता यांची चौकशी

याच घोटाळा प्रकरणात नाव आलेल्या बीआरएस नेत्या के. कविता शनिवारी (दि.११) ईडी पथकासमोर हजर राहणार आहेत. मद्य घोटाळा प्रकरणात नाव आलेल्या बीआरएस नेत्या आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी असलेल्या के. कविता शनिवारी (दि.११) ईडी पथकासमोर हजर राहणार आहेत. यापूर्वी, ईडीने त्यांना ९ मार्च रोजी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, कविता यांनी ईडीकडे वेळ मागितली होती. याप्रकरणी सीबीआयने त्यांची यापूर्वीच चौकशी केली आहे.

हेही वाचा 

 

Back to top button