मनीष सिसोदिया यांच्या एका ट्वीटने खळबळ, कारागृहात फोन कोठून आला? भाजपचा सवाल | पुढारी

मनीष सिसोदिया यांच्या एका ट्वीटने खळबळ, कारागृहात फोन कोठून आला? भाजपचा सवाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍लीतील मद्य घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले दिल्‍लीचे माजी उपमुख्‍यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया हे सध्या तिहार कारागृहात आहेत. बुधवार ८ मार्च रोजी सायंकाळी होळीनिमित्त त्‍यांनी आपल्‍या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट केले.या ट्वीट राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारागृहात सिसोदिया मोबाईल फोन कोठून आला?, असा सवाल करत भाजपने केला आहे.

भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी ट्विट केले आहे की, ‘कारागृहात असणार्‍या मनीष सिसोदिया यांच्‍याकडे फोन आहे?’
दिल्‍लीतील मद्य घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्‍वेषण विभागाने ( सीबीआय ) मनीष सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तेव्‍हापासून त्‍यांनी एकही ट्विट केले नव्हते. होळीच्या सायंकाळी त्‍यांनी आपल्‍या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आले असून, त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मनीष सिसोदिया यांच्या या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘आजपर्यंत ऐकले होते की देशात शाळा उघडतात तेव्हा तुरुंग बंद होतात; पण आता या लोकांनी देशात शाळा उघडणाऱ्यांनाच तुरुंगात टाकायला सुरुवात केली आहे.’

मनीष सिसोदिया यांच्या या ट्विटवर भाजपने सवाल केला आहे. दरम्‍यान, सिसोदिया यांचे हे अकाऊंट त्यांची सोशल मीडिया टीम किंवा त्यांची पत्नी हाताळत असल्याचे मानले जात आहे. हे ट्विट दोघांपैकी एकाने केल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबाबत आम आदमी पक्षाने कोणतेही स्पष्टीकरण केलेले नाही.

हेही वाचा :

 

Back to top button