Trainer Aircraft : ७० प्रशिक्षणार्थी विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा हिंदुस्थान एरोनॉटिक्सशी करार | पुढारी

Trainer Aircraft : ७० प्रशिक्षणार्थी विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा हिंदुस्थान एरोनॉटिक्सशी करार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सत्तर प्रशिक्षणार्थी विमानांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थान एरोनॉटिक्सशी मंगळवारी सामंजस्य करार केला. एचटीटी – 40 जातीच्या या विमानांसाठी संरक्षण मंत्रालय 6 हजार 800 कोटी रुपये खर्च करणार आहे.
खरेदी करण्यात आलेली बेसिक ट्रेनिंग विमाने हवाई दलाच्या ताफ्यात तैनात होतील. दरम्यान तीन प्रशिक्षणार्थी जहाजांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाने खाजगी क्षेत्रातील लार्सन अँड टूब्रो कंपनीसोबतही करार केला आहे. 3 हजार 100 कोटी रुपयांना हे जहाज खरेदी केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षणविषयक साहित्य खरेदी समितीच्या बैठकीत वरील दोन्ही बाबींच्या खरेदीला 1 मार्च रोजी मंजुरी देण्यात आली होती.
सत्तर प्रशिक्षणार्थी विमाने आणि तीन प्रशिक्षणार्थी जहाजांच्या खरेदी करारावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. हिंदुस्थान एरोनॉटिक्स 70 प्रशिक्षणार्थी विमाने सहा वर्षांच्या कालावधीत देणार आहे. वर्ष 2026 पासून त्याचा पुरवठा सुरु होईल.
हेही वाचा

Back to top button