Shaliza Dhami : भारतीय वायुसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच लढाऊ युनिटची कमान महिलेच्या हाती, ‘शालिझा धामी’ बनल्या पहिल्या ‘फ्रंटलाइन कॉम्बॅट युनिटची ग्रुप कॅप्टन’

Shaliza Dhami
Shaliza Dhami

पुढारी ऑनलाइन डेस्क : महिला दिनाच्या पूर्व संध्येला भारतीय वायू दल आणि लष्कराच्या वतीने उच्च पदावर महिलांची नियुक्ती करून महिलांचा सन्मान केला आहे. भारतीय वायू दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच लढाऊ युनिटची कमान एका महिलेच्या हाती सोपवली आहे. भारतीय वायुसेनेने पाश्चात्य क्षेत्रातील लढाऊ युनिटच्या ग्रुप कॅप्टन पदी शालिझा धामी Shaliza Dhami यांची निवड केली आहे.

भारतीय वायुसेनेच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिका-याला फ्रंटलाइन कॉम्बॅट युनिटची कमान सोपवण्यात आली आहे.
भारतीय लष्कराने प्रथमच महिला अधिका-यांना वैद्यकिय प्रवाहाच्या बाहेर कमांड भूमिका सोपवण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी सुमारे 50 जण ऑपरेशनल भागात युनिट्सच्या प्रमुख असतील. उत्तर आणि पूर्व दोन्ही कमांडमध्ये हे होईल.

ग्रुप कॅप्टन धामी Shaliza Dhami  यांना 2003 मध्ये हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि त्यांना 2,800 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. एक पात्र फ्लाइंग इंस्ट्रक्टर, त्यांनी वेस्टर्न सेक्टरमध्ये हेलिकॉप्टर युनिटची फ्लाइट कमांडर म्हणून काम केले आहे.

भारतीय लष्करात कर्नल या पदाला जसे महत्व आहे तसेच महत्व आयएएफमधील ग्रुप कॅप्टन या पदाला आहे. धामी सध्या फ्रंटलाइन कमांड हेडक्वार्टरच्या ऑपरेशन्स शाखेत तैनात आहेत. एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ यांनी धामी यांच्या कामाचे दोन वेळा कौतुक केले आहे. (Shaliza Dhami)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news