भाजपाच्या जाळ्यात अडकू नका, दरडोई उत्पन्नाची आकडेवारी दिशाभूल करणारी – खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे
मल्लिकार्जुन खर्गे
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – संयुक्त प्रगतीशील युती सरकारच्या १० वर्षांच्या काळात देशाच्या उत्पन्नात २५८.८ टक्क्यांनी वाढले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखाली सरकारच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात प्रति व्यक्ती उत्पन्न केवळ ९८.५ होतं. त्यांनी ट्विट केलं की, ''भारताच्या प्रती व्यक्ती उत्पन्नावर वृत्त बनवणाऱ्या भाजपाच्या जाळ्यात अडकू नका. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी काँग्रेसने दिलेली सुरक्षा छत्री भाजपच्या प्रचारापेक्षा अधिक मजबूत होती," असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी म्हटलं.

खर्गे यांनी एका ग्राफच्या माध्यमातून आकडे सादर करत हेदेखील म्हटलं की, संप्रग सरकारमध्ये २००४-२०१४ च्या दरम्यान प्रती व्यक्ती उत्पन्न २५८.८ टक्के वाढली तसेत २४,१४३ रुपयांहून ८६,६४७ रुपये झाली. तर २०१४ ते २०२३ दरम्यान हे ९८.५ टक्के वाढून १,७२,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकली. राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालय (एनएसओ) कडून मागील काही दिवसात जारी केलेल्या आकड्यांमध्ये सांगण्यात आलं आहे की, मोदी सरकार २०१४-१५ काळात सत्तेत आल्यानंतर सध्याच्या किमतींनुसार देशाचे दरडोई उत्पन्न दुप्पट होऊन १ लाख ७२ हजार रुपये झाले आहे.

परंतु, उत्पन्नाचे असमान वितरण एक मोठे आव्हान बनले आहे. एनएसओच्यानुसार, सध्याच्या किंमतीनुसार दरडोई वार्षिक उत्पन्न (निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १ लाख ७२ हजार रुपये असण्याचा अंदाज आहे. जे २०१४-१५ मदील ८६ हजार ६४७ रुपयांपेक्षा सुमारे ९९ टक्के अधिक आहे.

वास्तविक किमतींवरील देशाचे दरडोई उत्पन्न (स्थिर किमती) या कालावधीत सुमारे ३५ टक्क्यांनी वाढले. २०१४-१५ मध्ये ते ७२ हजार ८०५ रुपये होते, जे २०२२-२३ मध्ये वाढून९८ हजार ११८ रुपये होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news