आनंद महिंद्रा यांचा शायराना अंदाज!, पाहता पाहता ट्विट झाले तुफान व्हायरल | पुढारी

आनंद महिंद्रा यांचा शायराना अंदाज!, पाहता पाहता ट्विट झाले तुफान व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आणि प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते काही मनोरंजक व्हिडिओ आणि ट्विट शेअर करतात. त्यांनी केलेल्‍या पोस्ट चर्चेचा विषय ठरतो. नुकतेच त्यांचा शायराना अंदाज समोर आला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर मिर्झा गालिब यांची शायरी शेअर केली आहे. ही शायरी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या या पोस्टवर यूजर्सदेखील रंजक प्रतिक्रियाही देत आहेत.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अकाऊंटवरुन शनिवारी (दि. ४ मार्च) एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी एक शायरी लिहिली आहे.’ मिर्झा गालिब यांची ही शायरी आहे. त्यांच्या या शायरीवर जवळपास ७ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तसेच, लाइक आणि रिॲक्शनची ट्रेंड अजूनही सुरू आहे. त्याचबरोबर या पोस्टवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

Anand Mahindra यांनी शेअर केली मिर्झा गालिब यांची प्रसिद्ध शायरी

‘ख़ुदा की मोहब्बत को फ़ना कौन करेगा? सभी बन्दे नेक हों तो गुनाह कौन करेगा? ऐ खुदा मेरे दोस्तों को सलामत रखना, वरना मेरी सलामती की दुआ कौन करेगा और रखना मेरे दुश्मनों को भी महफूज़, वरना मेरी तेरे पास आने की दुआ कौन करेगा.” शनिवारी आनंद महिंद्रा यांनी ही मिर्झा गालिब यांची शायरी पोस्ट केली.

आनंद महिंद्रा यांच्‍या शायराना अंदाजावर अनेक कमेंट येत आहेत. एका युजरने त्यांच्या पोस्टवर लिहिले आहे की, ‘सर, माझ्या मते ही शायरी गालिबने लिहिले आहे; पण लेखक कोणही असो शायरी खूप सुंदरआहे.’ युजरच्या कमेंटला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले, ‘तुमचे म्हणणे बरोबर आहे. ओळी सुंदर आहेत, लेखक कोणीही असो.ं

हेही वाचा

Back to top button