पुढारी ऑनलाइन डेस्क : India Slams Turkey : भूकंपाने हादरलेल्या तुर्कस्तानला भारताने मदतीचा हात दिला. भारताने ऑपरेशन दोस्त अंतर्गत श्वानपथकासह एनडीआरएफच्या जवानांची दोन पथके आणि आवश्यक उपकरणे औषधेही पाठवली. याशिवाय जीवनावश्यक वस्तूंचा साठा पाठवला. तुर्कस्तानला मदत करणा-या देशांपैकी भारत हा पहिल्या 5 देशांमध्ये होता. मात्र, जगात काही लोक उपकारांची जाणीव ठेवत नाही. त्याप्रमाणे तुर्कस्तानला देखील याची जाणीव राहिली नाही. तुर्कस्तानने कृतघ्नपणे पुन्हा भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.
भूकंपाने उद्धस्त झालेल्या तुर्कस्तानला भारताने ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत पाठवली. मात्र, तुर्कस्तानने याची जाणीव न ठेवता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला साथ देत भारताविरोधी भूमिका घेतली. जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) ओआयसीच्या (ऑरगनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन) आणि तुर्की प्रतिनिधींनी पाकिस्तानचे समर्थन करून जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला.
मात्र, भारताने याला उत्तर देत तुर्कस्तान आणि पाकिस्तानला फटकारले. भारताने तुर्कस्तानवर टीका करत तुर्कीने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये अनावश्यक वक्तव्य करणे टाळावे, असे म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनच्या सचिव सीमा पुजानी यांनी पाकिस्तानलाही फटकारले. त्या म्हणाल्या पाकिस्तानच्या सर्वोच्च लष्करी तळाच्या ठीक समोर ओसामा बिन लादेन लपला होता. पाकिस्तानच्या सुरक्षा एजन्सीजने हाफिज सईद आणि मसूद अजहरला दशकांपर्यंत मदत आणि आश्रय दिला. पाकिस्तानच्या नीतींमुळे विश्वात हजारो लोक मृत्यूमुखी पडले. ज्यासाठी पाकिस्तान सरळ सरळ जबाबदार आहे.
पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यकांचे दमन केले जात आहे. धार्मिक अल्पसंख्यक मुक्तपणे राहू शकत नाही. आपल्या धर्माचे पालन करू शकत नाही. तसेच अहमदिया समुदायाच्या धार्मिक आचरणासाठी त्याचे उत्पीडन केले आहे. तर ईसाई समुदायालाही वाईट वागणूक दिली जाते, अशा शब्दात पाकिस्तानला भारताने फटकारले आहे.
हे ही वाचा :