Turkey Earthquakes : भूकंपबळींची संख्या ५० हजारांवर पोहोचली | पुढारी

Turkey Earthquakes : भूकंपबळींची संख्या ५० हजारांवर पोहोचली

पुढारी ऑनलाईन: तुर्कीतील महाभयंकर भूकंपाने अपरिमित जीवित आणि वित्‍तहानी झाली. यामुळे जगात चिंतेचे वातावण पसरले आहे. त्‍यातच तुर्कस्‍तान आणि सीरियामधील मृतांची एकत्रित संख्या ५०,००० वर पोहोचली आहे. तर या भीषण भूकंपामध्ये 5,20,000 अपार्टमेंट्स असलेल्या 1,60,000 इमारती कोसळल्या आहेत. किंवा त्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असा अहवाल रॉयटर्सने दिला आहे.

दक्षिण तुर्कीत झालेल्या भूकंपामुळे अजुनही लोकांचे मृतदेह समोर येत आहेत. शेजारच्या सीरियामध्ये मृतांची संख्या वाढलेली आहे. मदत आणि बचाव कार्यानंतर आता जीव वाचण्याची आशा फार कमी आहे. तसेच अशा स्थितीत आता बचावकार्य थांबण्याची शक्यता असल्याचेही आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले आहे.

बचावकार्य बंद झाल्यानंतर ढिगारा त्वरीत हटवला जाईल. यानंतर ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे मृतदेह समोर येऊ शकतात, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये ५०,००० लोकांचा मृत्‍यू झाला आहे. तर लाखो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक महत्त्वाची शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. जगभरातून मदतीचा ओघ सुरू असला तरी या दोन्ही देशांमध्ये भरून न येणारे मानवी आणि नैसर्गिक हानी झालेली आहे.

Back to top button