नवरा असावा तर असा..! बायकोसाठी बांधले तब्‍बल ७ कोटींचे मंदिर

नवरा असावा तर असा..! बायकोसाठी बांधले तब्‍बल ७ कोटींचे मंदिर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेब्रुवारी महिन्यातील Valentine Week हा प्रेमाच्या नात्याला अधिक घट्ट करणारा उत्‍सव सर्वत्र उत्‍साहात साजरा झाला.  या आठवड्यात गिफ्ट्सना भरपूर मागणी असते. नवीन लग्न झालेली जोडपी साथीदाराला भेटवस्तू देऊन आनंद साजरा करतात. यात काही हटके तर काही महागड्या गिफ्टचा समावेश असतो. सोशल मीडियावर सध्या अशी एक हटके प्रेमकथा खूप व्हायरल होत आहे.  पतीने आपल्‍या पत्‍नीसाठी तब्‍बल ७ कोटींचे मंदिर बांधल्‍याची ही गोष्‍ट आहे. या मंदिराची व्हिडिओ सध्‍या सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे.

ओडिशा राज्यातील खेत्रावासी लेनका आणि पत्नी बैजंती असे  प्रेमकथेतील दाम्‍पत्‍याचे नाव आहे. बैजंती या वैष्णवी देवीच्या भक्त आहेत. या दाम्पत्याच्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. खेत्रावासी यांनी पत्नीसाठी ७ कोटी रुपये खर्च करुन वैष्णवी देवीचे मंदिर बांधले आहे. जाजपूर जिल्ह्यात त्यांनी पत्नीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे मंदिर बांधले आहे.

Husband builds temple : ८५ फूट सभामंडप

बैजंती लेंका या बालपणापासून देवीच्या भक्त होत्या. देवीची रोज पूजा करण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पती खेत्रावासी लेनका यांनी मंदिर बांधले आहे. ६४ फूट उंचीचे मंदिर बांधण्यासाठी तामिळनाडूतील 30 कारागीर आणि राजस्थानमधील संगमरवरी कारागीरांना नियुक्त करण्यात आले होते. मंदिराच्या आतील मुख्य सभामंडपाची लांबी ८५ फूट आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news