WIPRO New COO : अमित चौधरी बनले विप्रोचे नवे सीओओ; १४ महिने होते रिक्त पद | पुढारी

WIPRO New COO : अमित चौधरी बनले विप्रोचे नवे सीओओ; १४ महिने होते रिक्त पद

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने अमित चौधरी यांची सीओओ (Cheif  Operating Officer) म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीने गुरुवारी (दि. ३) त्यांची नियुक्ती केली. भानुमूर्ती बल्लापुरम हे जुलै २०२१ मध्ये सीओओ म्हणून निवृत्त झाले. त्यामुळे विप्रोचे सीओओ हे पद गेल्या वर्षीच्या जुलैपासून रिक्त होते. तेव्हापासून त्यावर कोणाचीही नियुक्ती झालेली नव्हती. (WIPRO New COO)

विप्रोचे सीओओ बनण्याआधी अमित चौधरी हे कॅपजेमिनी या फ्रान्सच्या कंपनीत कार्यरत होते. चौधरी यांनी कॅपजेमीनीच्या आधी बोस्टन कंसल्टींग ग्रुप आणि केडेंस डिझाईन सिस्टिममध्ये काम केले आहे. त्यांनी आयआयटी कानपूर आणि आयआयएम, कलकत्ता येथून शिक्षण पूर्ण केले आहे.

WIPRO New COO : विप्रोचे सीईओ आणि नवे सीओओ पूर्वी एकाच कंपनीत

अमित चौधरी हे याआधी कॅमजेमीनी या नामांकीत आयटी कंपनीत फायनान्शियल सर्विसेस बिझनेस युनिटचे सीओओ होते. कॅपजेमिनी ही कंसल्टींग, टेक्नॉलॉजी सर्विसेस आणि डिजीटल ट्रान्सफॉर्मेशनशी संबंधित मोठी कंपनी आहे. विप्रोचे सध्याचे सीईओ थेरी डेलापोर्टे हे देखील कॅपजेमीनीमध्ये याआधी होते. २०२० मध्ये त्यांची विप्रोचे सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.

हेही वाचा

Back to top button