Earthquake Indore : मध्य प्रदेशातील इंदौरला भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

Earthquake Indore : मध्य प्रदेशातील इंदौरला भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रविवारी (दि. १९) दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपाच्या या धक्क्यांनी नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. (Earthquake Indore)

या भूकंपात अद्याप कोणतेही नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही. लोकांनी आपल्या घरातील वस्तू हलताना पाहिल्या तेव्हा त्यांना समजले की हे भूकंपाचे धक्के आहेत. यानंतर लोक घराबाहेर पडले. काही काळ लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रविवारी दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. जमिनीपासून १० किलोमीटर खोल इतके त्याचे केंद्र होते. इंदौरसह, धार, बरवानी आणि अलीराजपूर आणि खरगोन जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. (Earthquake Indore)

हेही वाचा

Back to top button