

पुढारी ऑनलाईन डेस्क : विवाहासाठी जबरदस्ती करणे ही एक प्रकारची क्रूरताच आहे. अशा प्रकारे झालेल्या विवाहातील पत्नीला घटस्फोट घेण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करत गुजरात उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला. प्राध्यापकाने तरुणीशी विवाह केला तेव्हा ती त्याची विद्यार्थिनी होती. विवाहासाठी प्राध्यापकाने आपल्यापेक्षा वयाने लहान असणार्या विद्यार्थिनीवर सक्ती केली. तिला वारंवार मेसेज पाठवले, हा एक प्रकारचा छळ होता. प्राध्यापक असणार्या व्यक्तीने आपल्या विद्यार्थिनीला असे संदेश पाठवणे याकडे छळ म्हणूनच पाहिले पाहिजे. दोघांच्या वयामध्ये मोठे अंतर होते. विवाहानंतर पत्नीला मिळालेली वागणूकही क्रूरताच होती , असेही न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती संदीप एन भट्ट यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
प्राध्यापकाने आपल्यापेक्षा वयाने १२ वर्षांनी लहान विद्यार्थिनीला पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 'तू माझ्याशी विवाह केल्यास माझ्या दोन मुलांना आईचे प्रेम मिळाले,' असेही सांगितले. विद्यार्थिनी विवाह प्रस्तावाला नकार दिला. यानंतरही प्राध्यापक वारंवार मोबाईल फोनवर मेसेज करुन आपला आग्रह कायम ठेवला. त्याने शैक्षणिक कागदपत्रे असल्याचे सांगत काही कागदपत्रांवर विद्यार्थिनीच्या सह्या घेतल्या होत्या. सह्या झाल्यानंतर त्यातील एक कागद हा लग्नाचा अर्ज असल्याचे प्राध्यापकाने विद्यार्थिनीला सांगितले.
प्राध्यापकाने विद्यार्थिनीवर विवाहासाठी जबरदस्ती केली. तसेच आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचेही सांगितले. अखेर पीडित विद्यार्थिनीने प्राध्यापकाशी विवाह केला. मात्र विवाहानंतर प्राध्यापकाची पहिली पत्नी जिंवत असल्याची माहिती तिला मिळाली. यानंतर पती आणि सासरच्या मंडळीने तिला तीनवेळा गर्भपात करण्यास भाग पाडले. सर्व शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पीडित पत्नीने गुजरातमधील अमरेली जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतली. कौटुंबिक न्यायालयाने पीडितेची बाजू ग्राह्य मानून तिला घटस्फोट मंजूर केला होता.
कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयास पतीने गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याने आपल्या याचिकेत दावा केला होता की, "संबंधित तरुणीyh शिक्षणासाठी त्याने पैसे दिले होते. जबरदस्तीने नव्हे तर आम्ही प्रेमविवाह केला होता. पत्नीने
न्यायालयात सादर केलेले पुरावे वस्तुनिष्ठ पुरावे दिलेले नाहीत."
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया आणि न्यायमूर्ती संदीप एन भट्ट यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी युक्तीवाद झाल्यानंतर २५ जानेवारी रोजी या प्रकरणी निकाल देताना खंडपीठाने स्पष्ट केले की, प्राध्यापकाने तरुणीशी विवाह केला तेव्हा ती त्याची विद्यार्थिनी होती. विवाहासाठी प्राध्यापकाने आपल्यापेक्षा वयाने लहान असणार्या विद्यार्थिनीवर सक्ती केली. तिला वारंवार मेसेज पाठवले. हा एक प्रकारचा मानसिक छळच होता. प्राध्यापक असणार्या व्यक्तीने आपल्या विद्यार्थिनीला विवाह करण्यासाठी संदेश पाठवणे या प्रकाराकडे छळ म्हणूनच पाहिले पाहिजे. दोघांच्या वयामध्ये मोठे अंतर होते. तसेच विवाहानंतर पत्नीला मिळालेली वागणूकही क्रूरताच ठरते, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
घटस्फोटांच्या बहुतेक प्रकरणांमध्ये पूर्ण घटनाच हीच वस्तनिष्ठ माहिती देत असते. पीडित पत्नीने केलेल्या आरोप सिद्ध करण्यासाठी पुरसे पुरावे आहेत. याप्रकरणी पतीने सादर केलेली वैद्यकीय कागदपत्रेच पत्नीची बाजू मांडतात. पीडित पत्नी ही गर्भवती होते हे स्पष्ट होते. तिचा तीनवेळा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला. विवाहासाठी सक्ती करणे ही एक प्रकारची क्रूरताच आहे. अशा प्रकारे झालेल्या विवाहातील पत्नीला घटस्फोटासाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट करत या प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दिलेला निकाल गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला.
हेही वाचा :