सरन्यायाधीशांनी दिली दोन न्यायमूर्तींना पद, गोपनियतेची शपथ | पुढारी

सरन्यायाधीशांनी दिली दोन न्यायमूर्तींना पद, गोपनियतेची शपथ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या मंजूर ३४ पदांपैकी सर्व पदे भरण्यात आली आहेत. न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांनी आज (दि.१३) पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. न्या. राजेश बिंदल अलाहाबाद उच्च न्यायालयाचे तर न्या. अरविंद कुमार गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सर्व न्यायमूर्तींच्या उपस्थितीत उभयंतांना शपथ दिली.

न्या. बिंदल आणि न्या. अरविंद कुमार यांच्या नियुक्तीनंतर न्यायालयातील स्वीकृत सर्व ३४ पदे भरण्यात आली आहेत. ३१ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने पदोन्नती करीता त्यांच्या नावांची शिफारस केली होती. केंद्र सरकारने १० फेब्रुवारीला त्यांच्या नियुक्तींना अधिसूचित केले. या नियुक्तीनंतर गेल्या एक आठवड्यात दुसऱ्यांदा शपथविधी समारंभ झाला आहे.

गत सोमवारी ५ न्यायमूर्ती पंकज मित्तल, न्या. संजय करोल, न्या. पी. व्ही. संजय कुमार, न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह तसेच न्या. मनोज मिश्रा यांनी शपथ घेतली होती. यापूर्वी सप्टेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान सर्वोच्च न्यायालयात न्यामूर्तींच्या स्वीकृत पदांपैकी कुठलेही पद रिक्त नव्हते.

हेही वाचा 

Back to top button