

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा अध्यक्षांना नोटीस दिल्याशिवाय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निराधार आरोप केले आहेत. त्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत केलेल्या आरोपासंदर्भात पुरावे दिले नाहीत, तर त्यांना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागू शकते, असे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी आज (दि.१३) माध्यमांशी बोलताना सांगितले. राहुल गांधी पंतप्रधानांची माफी मागून आपली खासदारकी वाचवू शकतात, असेही दुबे यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पंतप्रधानांनी नियमाच्या बाहेर जात उद्योगपती गौतम अदानी यांना मदत केल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावरुन लोकसभेत मोठा गदारोळ झाला होता. यावर भाजप खासदार दुबे आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गांधी यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली होती. या नोटीसीची दखल घेत लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा :