PM’s Shedule : 10 सार्वजनिक सभांसाठी मोदींचा चार दिवसात 10,800 किमी प्रवास | पुढारी

PM's Shedule : 10 सार्वजनिक सभांसाठी मोदींचा चार दिवसात 10,800 किमी प्रवास

पुढारी ऑनलाइन डेस्क : PM’s Shedule : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेळापत्रक 10 तारखेपासून प्रचंड व्यस्त आहे. 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान 90 तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी 10,800 किमी प्रवास करणार आहेत. त्यापैकी निम्मा प्रवास पूर्ण झाला असून पुढील प्रवास नियोजनानुसार होणार आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध विकास कामांचे लोकार्पण करतील. या कालावधीत मोदी 10 सार्वजनिक सभांना संबोधित करतील. या दरम्यान मोदी आगरतळा ते मुंबई आणि लखनौ ते बंगळूर असा देशाचा कानाकोपरा व्याप्त होणार आहे. याचे सविस्तर वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

TOI ने दिलेल्या माहितीनुसार, PM’s Shedule : 10 फेब्रुवारी रोजी, पंतप्रधानांनी दिल्ली ते लखनौ असा प्रवास केला आणि उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रस्ते प्रकल्प समर्पित केले. त्यानंतर, त्यांनी मुंबईतीलच अल्जामिया-तुस-सैफियाहच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले, त्यानंतर ते दिल्लीला परत आले. त्यांनी दिवसभरात 2,700 किमी अंतर कापले. दुसऱ्या दिवशी ते त्रिपुराला गेले. जिथे त्यांनी अंबासा आणि राधाकिशोरपूर येथे दोन सार्वजनिक सभांना संबोधित केले. त्यानंतर ते राष्ट्रीय राजधानीत परतत आहेत. त्यांनी दिवसभरात 3,000 किमीहून अधिक अंतर कापले.

PM’s Shedule : 12 फेब्रुवारीला, पंतप्रधान दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती स्मरणार्थ वर्षभराच्या उत्सवाचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते राजस्थानमधील दौसा येथे अनेक महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दौसा येथे दोन सार्वजनिक सभांना संबोधित केल्यानंतर, ते थेट बंगळुरूला जातील, जिथे ते दिवसात 1,750 किमी पेक्षा जास्त अंतर कापून रात्री उशिरा पोहोचतील.

PM’s Shedule : दुसऱ्या दिवशी पहाटे, पंतप्रधान बंगळुरूमध्ये एरो इंडिया 2023 चे उद्घाटन करतील. तेथून ते त्रिपुराला जाणार असून, ते दुपारी आगरतळा येथे जाहीर सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते ३,३५० किमीचे अंतर कापून दिल्लीला परततील.

हे ही वाचा :

Kangana Ranaut : ‘बिचारा आमीर खान !’

Kiara- Sidharth : सिद्धार्थ- कियाराच्या लग्नानंतर करणचं मोठं गिफ्ट!

Back to top button