

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; देशात एकूण १,३३३ बहुराष्ट्रीय कंपन्या (MNCs) बंद झाल्या आहेत. तर ४,९०० हून अधिक नवीन बहुराष्ट्रीय कंपन्या सुरु झाल्या आहेत. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली आहे. एकूण १,३३३ MNCs भारतात बंद झाल्या आहेत, त्यात ३१३ परदेशी आणि १,०१७ त्यांच्या उपकंपन्यांचा समावेश होता, असेही त्यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
काही बहुराष्ट्रीय कंपन्या बंद पडणे आणि काही नवीन कंपन्या सुरु होणे ही सामान्य बाब आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की बंद झालेल्या कंपन्यांच्या तुलनेत ४,९०६ नवीन बहुराष्ट्रीय कंपन्या सुरु झाल्या आहेत. यामुळे नवीन मार्ग खुले होतील आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे सोम प्रकाश यांनी म्हटले आहे.
पण राज्यमंत्र्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्या कोणत्या कालावधीत बंद झाल्या आणि नवीन कधी सुरु झाल्या याची माहिती दिलेली नाही. पण भारतात नवीन बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या संख्येने सुरु झाल्याचे नमूद केले आहे.
हे ही वाचा :