पुढारी ऑनलाईन : आतंरराष्ट्रीय प्रवासादरम्यान करावी लागणारी कोविड चाचणी (टेस्ट), 'एअर सुविधा' या पोर्टलवरील सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरणे आणि तो अपलोड करणे ही प्रक्रिया बंद करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या ट्विटरवरून दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी गुरुवार, ९ फेब्रुवारीपासून करण्यात आल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
भारतातील हवाई विभागाकडून कोविड संसर्गादरम्यान भारतात येणार्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरला अनिवार्यपणे भरला जावा, अशी घोषणा केली होती. केंद्रीय मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "भारत सरकारने चीन, सिंगापूर, हाँगकाँग, कोरिया, थायलंड आणि जपान येथून किंवा या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड-19 चाचणी आणि 'एअर सुविधा' फॉर्म अपलोड करणे बंद करण्यात येत आहे."
कोविड काळात आतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी 'एअर सुविधा' या पोर्टलची सुविधा सुरू केली होती. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर ती बंद करण्यात आली होती.चीनमधील वाढत्या कोविड प्रकरणांची दखल घेत भारत सरकारकडून खबरदारी म्हणून, ही सुविधा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा सुरू करण्यात आली होती. ती आता पूर्णत: बंद करण्यात आली आहे.
हेही वाचा :