भारत-पाक दरम्यान झाला 1.35 अब्ज डॉलर्सचा व्यापार | पुढारी

भारत-पाक दरम्यान झाला 1.35 अब्ज डॉलर्सचा व्यापार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : एप्रिल ते डिसेंबर 2022 या नऊ महिन्यांच्या कालावधीत भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान 1.35 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला असल्याची माहिती केंद्र सरकारकडून बुधवारी लोकसभेत देण्यात आली. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये दोन देशांदरम्यान 516.36 दशलक्ष डॉलर्सचा व्यापार झाला होता.

दरम्यान एप्रिल ते डिसेंबर 2022 या काळात चीनसोबतची भारताची व्यापार तूट 87 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली असल्याचेही व्यापार राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लेखी उत्तरादाखल सांगितले. 2019 साली भारताने जम्मू काश्मीरसाठीचे कलम 370 संपुष्टात आणले होते. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले होते. वर्ष 2019-20 मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यानचा व्यापार 830.58 दशलक्ष डॉलर्स इतका होता तर त्यानंतरच्या वर्षी हा व्यापार 329.26 दशलक्ष डॉलर्स इतका होता. सार्क देशांसोबतच्या व्यापारात वाढ करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे अनुप्रिया पटेल यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

हेही वाचा

Back to top button