Delhi Mayor election: भाजप-आप कार्यकर्त्यांची रस्त्यावर उतरून निदर्शने | पुढारी

Delhi Mayor election: भाजप-आप कार्यकर्त्यांची रस्त्यावर उतरून निदर्शने

दिल्ली,  पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आम आदमी पार्टी तसेच भाजप एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. दिल्ली  महापौरपदाची निवडणूक (Delhi Mayor election) पुन्हा टळल्याने मंगळवारी भाजप आणि आप रस्त्यावर उतरले.दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.आप कार्यालयाबाहेर भाजप,तर भाजप कार्यालयाबाहेर आप कार्यकर्त्यांनी आज ( दि. ७) आंदोलन करीत घोषणाबाजी केली. महापौर,उप-महापौरसह स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेली सभा गदारोळामुळे तिसऱ्यांदा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. परंतु, दोन्ही पक्ष यासाठी एकमेकांना जबाबदार धरत आहेत.

एमसीडी सभागृहात भाजप महिला नगरसेविकांसोबत गैरव्यवहार करण्यात (Delhi Mayor election) आला. दोन आमदारांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस शोध घेत आहेत, पंरतु ते सभागृहात दिसून आले, असा आरोप भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केला. महापौर, उपमहापौर तसेच स्थायी समिती सदस्यांची निवड एकाचवेळी करण्यात यावी. परंतु,आप त्याला विरोध दर्शवत आहे. कायद्याच्या चौकटीत महापौर पदाची निवडणूक घेण्यात यावी, अशी भाजपची मागणी असल्याचे वर्मा म्हणाले.

Delhi Mayor election : ‘आप’ची सर्वोच्च न्यायालयात धाव,आज सुनावणी

तिसऱ्यांदा  महापौर पदाची निवडणूक टळल्याने आप सदस्य शैली ओबेरॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्‍यांच्‍या याचिकेवर उद्या, बुधवारी याचिकेवर सुनावणी  होणार आहे. वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी ओबेरॉय यांची बाजू घेत भाजप लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप केला आहे.

 भाजप कार्यकर्त्यांनी रस्‍त्‍यावर बॅनर झळकावून निदर्शने केली. महापालिका असो की विधानसभा, आम आदमी पार्टी गदारोळ, कोलाहल, गोंधळ घालत आहे, असे बँनरवर लिहिले आहे. तर दुसरीकडे, आम आदमी पार्टीने हाती घेतलेल्या फलकांवर भाजपवाले लाज वाटते, लोकशाहीची हत्या करणे बंद करा, असे लिहीले (Delhi Mayor election)  आहे.

हेही वाचा 

Back to top button