सर्वोच्च न्यायालयाने केली राणा अय्यूबची याचिका रद्दबातल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गाझियाबादच्या विशेष न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला स्थगिती देण्यासंदर्भातील पत्रकार राणा अय्यूब हिची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने याआधी अय्यूबला तात्पुरता दिलासा दिला होता. मात्र, आता तिची याचिका फेटाळून लावली आहे.
केटो नावाच्या ऑनलाईन क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बेकायदा निधी जमवून त्याचा वैयक्तिक कारणांसाठी वापर केल्याचा गंभीर आरोप राणा अय्यूब हिच्याविरोधात आहे. केटो प्लॅटफॉर्मवर निधी जमवून अय्यूब हिने बराचसा पैसा आपले वडील आणि बहिणीच्या नावावर वर्ग केला होता. याशिवाय स्वतःसाठी तिने ५० लाख रुपयांची एफडी बनविली होती. तर चॅरिटीच्या माध्यमातून २९ लाख रुपये खर्च केले होते. सदर प्रकरणी गाझियाबादच्या विशेष न्यायालयाने २७ जानेवारीरोजी राणा अय्यूबला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. तथापि तिने या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने सदरची याचिका फेटाळून लावली आहे.
हेही वाचा
- White Tigress Vina Rani : ‘दिल्ली’ प्राणी संग्रहालयातील प्रमुख आकर्षण असलेली ‘पांढरी वाघीण वीणा राणी’चा मृत्यू
- Delhi Mayor Election : दिल्ली महापौरपदाची निवड तिसऱ्यांदा रद्द
- दिल्लीतील प्रमुख सरकारी कार्यालयांवर G20 posters लावले जाणार