शरद पवारही इं​​​​​​​दुरीकर महाराजांच्या किर्तनाचे फॅन; म्हणाले, मी टीव्हीवर त्यांना पाहत असतो | पुढारी

शरद पवारही इं​​​​​​​दुरीकर महाराजांच्या किर्तनाचे फॅन; म्हणाले, मी टीव्हीवर त्यांना पाहत असतो

पुणे : महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले नगर जिल्ह्यातील कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहूणे म्हणून एकाच कार्यक्रमाला उपस्थित होते. कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त इंदुरीकर महारांजाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, संसंदेच्या अधिवेशनासाठी जायचे असल्याने मी इंदुरीकर महाराजांचे किर्तन ऐकू शकत नाही, अशी खंत व्यक्त केली.

शरद पवार म्हणाले, आपल्याला त्यांचे किर्तन आवडते. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनामध्ये अनेक गंमती असतात. हे सर्व मी टीव्हीवर पाहत असतो. त्यांची अ‍ॅक्शन, त्यांची टाळ वाजवण्याची पद्धत, नृत्य हे सर्व उत्तमच असते. आता या सर्व गोष्टी मी सांगत नाही. समाजावर सहजपणे संस्कार कसे करता येतील हे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याकडून शिकावे.

ते पुढे म्हणाले, इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रात उत्तम काम करत असतात. या कार्यक्रमात मला इंदुरीकरांचे कीर्तन ऐकता येणार नाही. कारण संसदेच्या अधिवेशनासाठी मला आता निघायचे आहे. मात्र पुढच्या वेळी त्यांचे किर्तन ऐकल्याशिवाय मी राहणार नाही. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी कार्यक्रमात बोलताना दिली.

Back to top button