अदानी हिंडनबर्ग वादावर केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली प्रथमच प्रतिक्रीया | (Nirmala Sitharaman On Adani-Hindenburg Row) | पुढारी

अदानी हिंडनबर्ग वादावर केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली प्रथमच प्रतिक्रीया | (Nirmala Sitharaman On Adani-Hindenburg Row)

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : हिंडेनबर्गच्या अहवालामुळे (Hindenburg Reserch Report) अदानी समूहाला (Adani Group) मोठ्या तोट्याचा सामना करावा लागत आहे. या अहवालामुळे गेल्या सहा दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांचे ४६ टक्के नुकसान झाले आहे. त्याचबरोबर, कंपनीच्या मार्केट कॅपला ८७६५२४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी अदानींच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीय बँका आणि एलआयसी (LIC) यांनाही झटका बसला आहे. गुंतवणूकदारही चिंतेत आहेत. या मुद्द्यावरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अदानी प्रकरणी प्रथमच आपले मत मांडले आहे. (Nirmala Sitharaman On Adani-Hindenburg Row)

एलआयसी आणि एसबीआयच्या गुंतवणुकीबाबत सोडले मौन (Nirmala Sitharaman On Adani-Hindenburg Row)

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, भारतीय बँकिंग प्रणाली चांगल्या स्थितीत आहे. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. त्या पुढे म्हणाले की, अदानी समूहातील एसबीआय आणि एलआयसी या दोन्हींची गुंतवणूक मर्यादेत आहे. त्या पुढे असेही म्हणाल्या, की बँक आणि एलआयसी दोन्ही फायद्यात आहेत आणि गुंतवणूकदारांना सध्या काळजी करण्याची गरज नाही. (Nirmala Sitharaman On Adani-Hindenburg Row)

यावेळी निर्मला सीतारामन म्हणाल्या की, माझ्या समजुतीनुसार, अदानी समूहातील एलआयसी आणि एसबीआयची गुंतवणूक ठविण्यात आलेल्या मर्यादेतच आहे. यावेळी त्यांनी अदानी समूहातील एसबीआय आणि एलआयसीच्या गुंतवणुकीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांनाही स्पष्टपणे उत्तरे दिली. त्या म्हणाल्या, की मी नमूद करू इच्छिते की SBI आणि LIC या दोघांनी त्यांची तपशीलवार माहिती संबंधित CMD सोबत शेअर केली आहे. त्या अशाही म्हणाल्या की, भारतीय बँका आज एनपीएचे ओझे कमी करण्यात यशस्वी ठरल्या असून त्या मजबूत स्थितीत आहेत.

या मुलाखतीत त्यांनी असेही सांगितले की, एसबीआय आणि एलआयसीने माहिती दिली आहे. आपण ओव्हरएक्सपोज केलेले नसल्याचे दोघांनी स्पष्ट केले आहे. दोघांच्या वतीने अदानी समूहाच्या शेअर्सचे एक्सपोजर मर्यादेत असल्याची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. त्यांचे मूल्यांकन घसरल्यानंतरही ते फायद्यात आहेत. सीमारामण म्हणाल्या की, सध्या भारतीय बँकिंग व्यवस्थेने एनपीएचे ओझे कमी केले आहे. बँकेकडे मजबूत दुहेरी ताळेबंद आहे. एनपीए आणि रिकव्हरी स्थिती चांगली आहे.


अधिक वाचा :

Back to top button