नारायण राणेंना आरोपाचं उत्तर कोर्टात द्यावं लागेल: संजय राऊत | पुढारी

नारायण राणेंना आरोपाचं उत्तर कोर्टात द्यावं लागेल: संजय राऊत

दिल्ली : पुढारी ऑनलाईन – भाजपच्या नादाला लागून नारायण राणे खोटे बोलत आहेत. सार्वजनिक मंचावरून राणेंनी खोटे आरोप केल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. नारायण राणे खोटं बोलत आहेत, नारायण राणेंना आरोपाचं उत्तर कोर्टात द्यावं लागेल, असे राऊत य़ांनी स्पष्ट केले. ते संजय राऊतांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे, या मुद्दयावरून प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राणेंना सर्वात आधी पद बाळासाहेबांनी द्यावं, याचं त्यांनी भान ठेवावं, असंही त्यांनी नमूद केलं. किरीट सोमय्यांवरही मानहाणीचा खटला दाखल करणार. आमचं नाणं खणखणीत, बाळासाहेबांचे आमच्यावर संस्कार झालेत, असे राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले-आम्हाला प्रत्येक पद बाळासाहेबांनी दिली. महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रत्येक निवडणूक एकीने लढतोय. शिक्षक, पदवीधरांनी भाजपला नाकारलं आहे. सत्यजीत तांबे काँग्रेससोबतचं राहतील. आम्हाला महाविकास आघाडी मजबूत करायची आहे. शिक्षक, पदवीधर निवडणुकीत भाजपकडे उमेदवारचं नव्हते. अख्खा देश लुटला गेला आहे. निवडणुकीत आम्ही मविआ म्हणून लढलो. महाविकास आघाडी म्हणून आम्ही भविष्यातही लढू.

दरम्यान, संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद कोर्टात पोहोचला आहे. संजय राऊतांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. एका भाषणावेळी नारायण राणे यांनी राऊत यांच्याविषयी वक्तव्य केले होते. राणे म्हणाले होते की-“संजय राऊत यांना मी खासदार केलं आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी मी पैसे खर्च केले आहेत. संजय राऊत यांचं मतदार यादीत नावही नव्हतं”. या विधानावर राऊतांनी आक्षेप घेत त्यांना नोटीस पाठवली आहे.

Back to top button