Air India: एअर इंडिया विमानाच्या इंजिनमध्ये जाळ दिसताच, विमानाचे सुरक्षित लँडिंग | पुढारी

Air India: एअर इंडिया विमानाच्या इंजिनमध्ये जाळ दिसताच, विमानाचे सुरक्षित लँडिंग

पुढारी ऑनलाईन: अबूधाबीहून कालिकतला जाणारे एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान एका इंजिनमध्ये जाळ लागल्याचे दिसताच वैमानिकाने परत अबुधाबी विमानतळावर विमान सुरक्षित लँडिंग केले, असे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले. एअर इंडिया एक्स्प्रेस फ्लाइट IX348 च्या वैमानिकाने ही इंजिनला लागलेली आग लक्षात घेतली आणि विमान पुन्हा अबूधाबीकडे परत घेण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइटमध्ये एकूण 184 प्रवासी होते, तेव्हा एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. यापूर्वी 23 जानेवारी रोजी त्रिवेंद्रमहून मस्कतला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने 45 मिनिटांनी त्रिवेंद्रमला परतावे लागले होते.

हेही वाचा:

Back to top button