Gold Price | या वर्षी लग्न करतायं; आताचं सोने खरेदी करा: दरात मोठी वाढ होणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : या वर्षी लग्न करण्याच्या विचारात असलेल्या विवाहच्छुकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण सोने दरात (Gold Price) मोठी वाढ होण्याचा अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. ६४ हजारांवर प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आठवड्य़ाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सराफ बाजारात तेजी दिसून आली. सोन्याच्या दरात आज (दि.३०) ९९ रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने दराने ५७ हजार २८८ रुपयांचा टप्पा ओलंडला आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर शुक्रवारी ५७, १८९ रुपयांवर स्थिर होता. चांदीच्या दरात १४२ रुपयांची वाढ झाल्याने ६८ हजार ३३४ रुपयांवर दर स्थिर आहे. सोने दर ५७ हजारांवर पोहोचला आहे. २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात ९१ रपयांची वाढ झाली आहे. ५२ हजार ४७६ प्रति १० ग्रॅमचा दर (Gold Price) आहे.
Gold Price : सोने, चांदीचा दर जाणून घ्या
IBJA (इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि.) वेबसाईटवर २४ ते १४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर दिला आहे. त्याच्यासोबत १ किलो चांदीचा दरही दिला आहे. जाणकारांच्या मते या वर्षी सोन्याचा दर ६४ हजारांवर पोहोचू शकतो. एका तज्ज्ञाच्या मते सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये सोने दर ६४ हजारांचा टप्पा पार करू शकतो. सेंट्रल बँकेने सोने खरेदी केल्याचा सकारात्मक परिणाम सोने दरावर दिसून येत आहे, असेही सराफा बाजारातील तज्ज्ञ सांगतात.
सोने दर प्रती १० ग्रॅम आणि चांदी दर प्रती किलो खालीलप्रमाणे
धातू ३० जानेवारी २७ जानेवारी वाढ
Gold ९९९ (२४ कॅरेट) ५७२८८ ५७१८९ ९९
Gold ९९५ (२३ कॅरेट) ५७०५९ ५६९६० ९९
Gold ९१६ (२२ कॅरेट) ५२४७६ ५२३८५ ९१
Gold ७५० (१८ कॅरेट) ४२९६६ ४२८९२ ७४
Gold ५८५ (१४ कॅरेट) ३३५१४ ३३४५६ ५८
silver ९९९ ६८३३४ ६८१९२ १४२
हेही वाचलंत का ?
- Gold price | सोन्याने ओलांडला ५७ हजारांचा विक्रमी टप्पा, दरवाढीमागे काय कारण?
- Gold Prices | सोन्याच्या दराने आजवरचे सर्व रेकॉर्ड तोडले, जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर
- Gold Prices Today | सोन्याचा दर पुन्हा सर्वकालीन उच्चांकाजवळ, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटचा दर