भारत जोडो यात्रेतील सुरक्षा ढासळली; मल्लिकार्जुन खर्गेंचे अमित शहांना पत्र

congress: भारत जोडो यात्रा
congress: भारत जोडो यात्रा

पुढारी ऑनलाईन: भारत जोडो यात्रा ही सध्या जम्मू काश्मीरमधील अवंतीपोरा येथून मार्गक्रम होत आहे. ३० जानेवारीला राहुल गांधी यांची यात्रा श्रीनगर येथे पोहोचत आहे. याठिकाणी काँग्रेसने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दरम्यान, या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था ढासळल्याचे दिसत आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित स्वत: हस्तक्षेप करत, येथील अधिकाऱ्यांना पुरेशा सुरक्षा पुरविण्याच्या सूचना देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून साखळी बॉम्बस्फोटाची मालिका या भागात सुरू आहे. तसेच यात्रेदरम्यान या भागत अनेक समस्या जाणवत आहेत. भारत जोडो यात्रा शुक्रवारी (दि.२७) जम्मू काश्मीरमध्ये असताना, दुपारच्या सत्रासाठी "सुरक्षेतील त्रुटी" मुळे स्थगित करण्यात आली. भारत जोडो यात्रा ही शेवटच्या टप्प्याकडे मार्गक्रम होत आहे. दरम्यान, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी राहुल गांधी यांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप देखील काँग्रेसने या पत्राद्वारे केला आहे.

पुढील दोन दिवसांत या यात्रेत आणि ३० जानेवारीला श्रीनगर येथे होणार्‍या काँग्रेसच्या समारंभात जगभरातून मोठा जनसमुदाय सामील होण्याची आमची अपेक्षा आहे. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते आणि इतर महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे नेते या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही या प्रकरणी वैयक्तिकरित्या हस्तक्षेप करून संबंधित अधिकार्‍यांना यात्रा आणि ३० तारखेच्या समारंभापर्यंत पुरेशी सुरक्षा पुरवण्याचा सल्ला दिलात तर मी आभारी आहे. असा स्पष्ट उल्लेख काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गृहमंत्री अमित शहा यांना लिहलेल्या पत्रात केला आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news