तिरुवनंतपुरम; पुढारी ऑनलाईन : केरळमधील या प्रकरणी मुलीच्या वडिलांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम जिल्ह्यातील नेदुमंगडू येथील पनवूर येथे ही घटना घडली आहे. आरोपी मुलाने २०२१ मध्ये पीडितेवर अनेकदा बलात्कार केला होता. (Kerala)
पोलिसांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. आरोपी तरुणाचे नाव अमीर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तो २३ वर्षांचा आहे. याशिवाय अल्पवयीन मुलीचे वडील आणि स्थानिक मशिदीचे मौलवी उस्ताद अन्वर सदाथ (वय ३९) यांनाही हे लग्न लावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, लग्न १८ जानेवारीला पार पडले होते. (Kerala)
शाळेच्या अधिकाऱ्यांनी मुलीची दीर्घ गैरहजेरीबद्दल चौकशी केली आणि तिचा विवाह झाल्याचे समजले तेव्हा ही घटना उघडकीस आली. शाळेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास करून तीन आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीचे नाव अल-अमिर असे आहे. पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती, मात्र तो सध्या जामिनावर बाहेर होता.
तिघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे गेल्या वर्षी अरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात टाकण्यात आले होते, मात्र तो जामिनावर सुटला असून तो सतत मुलीच्या कुटुंबीयांना लग्नासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होता. आमिर, मुलीचे वडील आणि मौलवी यांच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक न्यायालयाने तिघांनाही कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याने त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधिक वाचा :