Madhya Pradesh | सूर्यकुमार यादवसह तिघा क्रिकेटपटूंनी घेतले बाबा महाकालचे दर्शन, ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना | पुढारी

Madhya Pradesh | सूर्यकुमार यादवसह तिघा क्रिकेटपटूंनी घेतले बाबा महाकालचे दर्शन, ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना

उज्जैन (मध्य प्रदेश) : पुढारी ऑनलाईन; टीम इंडियाचा क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव (Indian cricketers Suryakumar Yadav), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात जाऊन बाबा महाकालची भस्म आरती (Baba Mahakal’s Bhasma Aarti) केली. येथील महाकालेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. यावेळी क्रिकेटपटूंनी अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली.

यावेळी सूर्यकुमार यादव म्हणाला की, ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही महाकालेश्वर मंदिरात प्रार्थना केली. पंतचे संघात पुनरागमन होणे हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्ही न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली आहे. आता आम्ही न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याची वाट पाहत आहोत. दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान वन-डे मालिकेतील शेवटचा सामना इंदूर येथे २४ जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.

भगवान महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरती केल्यानंतर तिघा क्रिकेटपटूंनी जलअभिषेक केला. यावेळी उपस्थित पुजाऱ्यांनी हर हर महादेवचा जयघोषही केला. भगवान महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी तिन्ही खेळाडूंनी गर्भगृहात धोतर आणि उपरणे परिधान केले होते. (Ujjain, Madhya Pradesh)

वन-डे मालिकेतील तिसरा सामना २४ जानेवारीला इंदूरमध्ये

भारत विरुद्ध न्यूझीलंड वन-डे मालिकेतील तिसरा सामना २४ जानेवारीला इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. आता तिसर्‍या सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडला ‘व्हाईट वॉश’ देण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. मात्र, या सामन्यात भारतीय संघात मोठे बदल केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

कर्णधार रोहित शर्माने दुसर्‍या वन-डे सामन्यानंतर वेगवान गोलंदाजांचे कौतुक केले होते. या सामन्यात मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करताना दिसत आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

तिसर्‍या वन-डेमध्ये होणार बदल

मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना एकदिवसीय सामन्यासाठी आराम दिला जाऊ शकतो. कारण पुढील ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या वेगवान गोलंदाजांच्या जागी उमरान मलिकला संधी दिली जाऊ शकते. उमरानसोबतच शाहबाज अहमदलाही या सामन्यात संधी दिली जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे ही वाचा :

Back to top button