पीएफआयचा 2047 पर्यंत भारताच्या इस्लामीकरणाचा कट

पीएफआयचा 2047 पर्यंत भारताच्या इस्लामीकरणाचा कट
Published on
Updated on

बंगळूर, वृत्तसंस्था : कर्नाटकमधील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेल्लारे येथे 26 जुलै 2022 रोजी भाजप नेते प्रवीण नेत्तारू यांची हत्या झाली होती. या हत्येत 'पीएफआय' या बंदी घालण्यात आलेल्या फुटीरवादी संघटनेचा हात होता. अशा जिहादी कृत्यांच्या माध्यमातून येत्या 2047 पर्यंत भारताचे संपूर्ण इस्लामीकरण करण्याचा कट या संघटनेने रचला होता, असे पीएफआयच्या 20 सदस्यांविरुद्ध बंगळूर विशेष न्यायालयात 'एनआयए'ने शुक्रवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

नेत्तारू यांच्या हत्येच्या तपासादरम्यान देशात विशिष्ट समुदायाची दहशत निर्माण करणे, जातीय द्वेष आणि अशांतता पसरवणे व 2047 पर्यंत भारतात इस्लामिक राजवट प्रस्थापित करणे हा या संघटनेचा डाव असल्याचेही उघडकीस आले.

संघटनेच्या बैठकीत मुस्तफा पाचर याला जिल्ह्यातील विशिष्ट समुदायातील विशेष व्यक्तींचे हत्याकांड घडवून आणण्यासाठी त्यांची ओळख पटविण्याची तसेच त्यांच्यावर पाळत ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार चार जणांची हत्या करण्याचे ठरले. पहिला हल्ला प्रवीण नेत्तारू यांच्यावर करण्यात आला. नेत्तारू भाजप युवा मोर्चाचे सदस्य होते.

सहा आरोपी अद्यापही फरार

पीएफआयच्या या 20 सदस्यांपैकी 6 जण अद्यापही फरार आहेत. माहिती देणार्‍यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. भा.दं.वि. कलम 120 इ, 153 अ, 302 व 34 आणि बेकायदा क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या कलम 16, 18 व 20 तथा कलम 25 (1) (र) अंतर्गत सर्व आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दुकान बंद करून परतताना हत्या

26 जुलै 2022 रोजी प्रवीण पोल्ट्रीचे दुकान बंद करून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यांनी प्रवीणवर कुर्‍हाडीने वार केले. प्रवीण यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रवीण यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेत्तारू येथे आणण्यात आले होते.

सर्व्हिस टीम अन् किलर स्क्वॉडस्!

इस्लामी राष्ट्र निर्मितीची कारस्थाने प्रत्यक्षात आणण्यासाठी जिहादी पथकांचीही स्थापनाही पीएफआय संघटनेकडून करण्यात आली होती. या पथकांना सर्व्हिस टीम किंवा किलर स्क्वॉडस् असे नाव देण्यात आले, असेही एनआयएने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news