

पुढारी ऑनलाईन डेस्क : आता शेअर विक्री आणि खरेदीनंतर गुंतवणूकदारांना पूर्वीपेक्षा लवकर पैसे मिळणार आहेत. शेअर बाजार व्यवहारातील नियमात ( T+1 settlement) बदल करण्यात आला असून, २७ जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. जाणून घेवूया नवीन बदलाविषयी…
सध्या शेअर बाजारमध्ये टी+2 सेटलमेंट योजना लागू आहे. यामध्ये गुंतवणूकदाराने शेअर्स बाजारात खरेदी केल्यानंतर त्याच्या खात्यावर ४८ तासांच्या आत पैसे जमा केले जातात. हाच नियम शेअर विक्रीच्यावेळीही लागू होता. आता २७ जानेवारीपासून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या खरेदी आणि विक्री व्यवहारासाठी टी+1 सेटलमेंट योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
T-1 settlement योजना भारतीय शेअर बाजारात २७ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे. याचा परिणाम देशातील प्रत्येक लहान-मोठ्या गुंतवणूकदारांवर होणार आहे. यामुळे, शेअर मार्केटमधील व्यवहार पूर्वीपेक्षा खूप जलद गतीने होतील. आणि गुंतवणूकदाराला शेअर्स विक्री आणि खरेदी केल्यानंतर २४ तासांनंतर पैसे मिळतील. (हे व्यवहार सुटीचे दिवस वगळून होतील.) पूर्वी शेअर्स खेरदी किंवा विक्रीनंतर ४८ तासांच्या आत रक्कम गुंतवणूकदारांच्या खात्यावर जमा केली जात असे. आता T+1 सेटलमेंट योजनेनुसार गुंतवणूकदाराच्या वतीने शेअर खरेदी किंवा विक्री केल्यास २४ तासांच्या आत संबंधितांच्या खात्यांवर रक्कम जमा केली जाणार आहे. हे सर्व समभागांना लागू होईल.
25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रथमच, शेअर बाजारातील बाजार मूल्यानुसार 100 सर्वात लहान समभागांमध्ये T-1 settlement योजना लागू केली होती. त्यानंतर, मार्च 2022 पासून समभागांची सेटलमेंट मासिक आधारावर श्रेणीबद्ध पद्धतीने T+2 वरून T+1 मध्ये बदलली जात होती. T-1 settlement योजना लागू झाल्यानंतर लोकांना पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पैसे मिळतील. यामुळे बाजारातील लिक्विडिटी
( तरलता) ही वाढू शकते आणि मार्जिनची गरजही खाली येईल, असे मत शेअर बाजारांमधील जाणाकार व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :