Sanjay Raut News : कॉंग्रेसशिवाय कोणतीही आघाडी पूर्ण होणार नाही- संजय राऊत

Sanjay Raut News : कॉंग्रेसशिवाय कोणतीही आघाडी पूर्ण होणार नाही- संजय राऊत

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "मला राहुल गांधी यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता माहिती आहे, मला त्यांची दिनचर्याही माहिती आहे,  मी त्यांना खूप दिवसापासून ओळखतो. आमचं वेगळ नातं आहे. आमच्या दोघांमध्ये खूप चांगला संवाद आहे. ते कालपासून माझी वाट पाहत होते. मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी माझी चैौकशी करायचे. असं वक्तव्य माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी केले. वाचा सविस्तर बातमी. (Sanjay Raut News)

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत हे आज जम्मू येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. जम्मूत आज पाऊस पडत आहे. मात्र पावसातही राहुल गांधी व संजय राऊत हे पदयात्रेत सहभागी होते. आजच्या पदयात्रेतील १२ किलोमीटरचा टप्पा पूर्ण केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, "मला राहुल गांधी यांच्या क्षमतेबद्दल माहिती आहे. मी त्यांना खूप दिवसापासून ओळखतो. आमचं वेगळ नातं आहे. आमच्या दोघांमध्ये संवाद खूप चांगला आहे. ते कालपासून माझी वाट पाहत होते. मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी माझी चौकशी करायचे.

Sanjay Raut News : कॉंग्रेसशिवाय विरोधक आघा़डी ही भाजपला मदत

ते पुढे असेही म्हणाले की, आजच्या पहिल्या टप्प्यात १२ किलोमीटरचे अंतर पार केले. राहुल गांधी प्रेमानेच भेटतात. भारत जोडो यात्रेला सर्वसामान्य़ जनतेचा पाठींबा आहे. राहुल गांधीही म्हणतात 'डरो मत' आणि मी ही म्हणतो 'डरो मत' हे आमच्यात साम्य आहे. यावेळी त्यांनी माझ्या घरच्यांची चौकशी केली. मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी माझी चौकशी करायचे. ईडी चौकशीबाबत आम्ही दोघांचे अनुभव सांगितले. त्याचबरोबर नजिकच्या काळातील राजकारणाविषयी चर्चा केली. महाराष्ट्राच्या राजकारणा विषयी चर्चा केली. त्याचबरोबर संजय राऊत असेही म्हणाले की,  कॉंग्रेसशिवाय कोणतीही आघाडी पूर्ण होणार नाही. आपल्या महत्त्वकांक्षा बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कॉंग्रेसवगळून भाजप विरोधात आघाडी पूर्ण होणार नाही. कॉंग्रेसशिवाय विरोधक आघा़डी ही भाजपला मदत. सर्वांनी एकत्र राहणं गरजेचं आहे.

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह या संदर्भात बोलत असताना ते म्हणाले, निवडणूक आयोगावर माझा पूर्ण विश्वास निवडणूक पक्षपाती भूमिका घेणार नाही. खरतर भाजपनं शिवसेना फोडली. पण आम्ही शुन्यातून उभे राहू.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news