RBI : भारताचा जीडीपी यावर्षी 3700 अब्ज डॉलर असेल, महागाई नियंत्रणात आणणे आवश्यक

RBI
RBI
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : RBI : भारताची देशांतर्गत अर्थव्यवस्था यावर्षी 2023 पर्यंत 3700 डॉलर अब्ज इतकी असेल. तसेच जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून ब्रिटनच्या पुढेच राहील. 2023 मध्ये महागाई नियंत्रणात आणणे आवश्यक आहे जेणेकरून 2024 पर्यंत महागाई अपेक्षित लक्ष्यानुसार राहील. ही दुसरी उपलब्धी असेल, असे आरबीआयने गुरुवारी जारी केलेल्या एका लेखात म्हटले आहे.

आरबीआयचे डेप्यूटी गव्हर्नर मायकेल देबब्रता पात्रा यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी एक लेख जारी केला. या लेखात म्हटले आहे की मॅक्रो इकॉनॉमी आघाडीवर स्थिरता मजबूत अवस्थेत आहे. तर स्टेट ऑफ द इकॉनॉमी या शीर्षकाच्या लेखात म्हटले आहे की, चलनविषयक धोरण महागाई समाधानकारक पातळीवर आणण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. महागाई समाधानकारक पातळीवर आणणे हे चलनविषयक धोरणाचे पहिले उद्दीष्ट होते. ते यशस्वी ठरले आहे. ही पहिलीच कामगिरी आहे.

RBI : देबब्रता पात्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमने लेखात असेही म्हटले आहे की 2023 महागाई नियंत्रणात आणणे आवश्यक आहे. जेणेकरून ती 2024 पर्यंत लक्ष्यानुसार राहील आणि ही दुसरी उपलब्धी असेल. भारतात वस्तूंच्या किमती नरमल्याने आणि इतर खर्चात कपात झाल्यामुळे कंपन्यांची कामगिरी सुधारली आहे.

RBI : भारत 2027 पर्यंत जगात तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा हवाला देत, लेखात म्हटले आहे की भारत 2025 पर्यंत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि 2027 पर्यंत 5,400 अब्ज डॉलरची तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.

उदयोन्मुख बाजारपेठा गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मजबूत दिसत आहेत, परंतु 2023 मध्ये अमेरिकेचे चलन विषयक धोरण आणि डॉलर हा त्यांचा सर्वात मोठा धोका असेल.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news