पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर संकल्पनेअतंर्गत रस्त्यांवर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी व त्यांच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी निधी (Prime Minister Street Vendor's AtmaNirbhar Nidhi (PM SVANidhi) scheme) योजना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर योजना ०२ जुलै २०२० पासून या योजना लागू करण्यात आली असून अनेक विक्रेत्यांनी या योजनेतून लाभ घेत आत्मनिर्भरतेकडे पाऊल टाकले आहे. या योजनेची मुदत डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. २०२४ पर्यंत या योजने अंतर्गत ४२ लाख पथविक्रेत्यांना लाभ मिळवून देण्याचा सरकारचा मानस आहे. (PM SVANidhi)
या योजने अंतर्गत व्यवसाय उभारणीसाठी १० हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल विना तारण उपलब्ध करुन दिले जाते. या कर्जाचा कालवधी हा १ वर्षापर्यंतचा देण्यात येतो. नियमित कर्जफेडणाऱ्यास प्रोत्साहन देण्यासाठी ७ टक्के वार्षिक दराने व्याज अनुदान दिले जाते. तसेच डिजीटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रतीवर्ष १२०० पर्यंतचे कॅशबॅक देण्यात येते. तसेच पहिल्यांदा १० हजार रुपयांचे त्यानंतर २० हजार रुपये आणि या दोन्ही कर्जांची वेळेवर पुर्तता झाल्यानंतर लाभार्थ्यांना ५० हजार रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.
एका अहवालानुसार ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत ३१.७३ लाख विक्रेत्यांनी १० हजार रुपयांच्या कर्जाचा लाभ घेतला आहे. ५ लाख ८१ हजार विक्रेत्यांनी २० हजार रुपयांच्या कर्जाचा लाभ घेतला आहे. तर ६ हजार ९२६ विक्रेत्यांनी ५० हजार रुपयांच्या कर्जाचा लाभ उठवला आहे.
कसा करावा अर्ज
आपण जर फिरते अथवा पथ विक्रेते असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही १० हजार किंवा २० हजारांच्या कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता. (PM SVANidhi)
अधिकाधिक पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान स्वनिधीचे मोबाईल ॲप्लीकेशन सुद्धा कार्यरत आहे. या ॲपद्वारे मोबाईल वरुन सदर योजनेसाठी अर्ज दाखल करु शकतो. (PM SVANidhi)
कोणकोणती कागदपत्रे आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पथविक्रेता हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, बँक खाते पासबुक असणे आवश्यक आहे. तसेच या योजनेचा लाभ छोटे आणि पथविक्रेत्यांनाच मिळू शकतो.
कोणाकोणाला मिळू शकते कर्ज
कोण देऊ शकते कर्ज
अधिक वाचा :