Rishi Sunak : मोदींची बाजू घेत ब्रिटन पंतप्रधानांनी पाक वंशाच्या खासदाराला झापले, म्हणाले… | पुढारी

Rishi Sunak : मोदींची बाजू घेत ब्रिटन पंतप्रधानांनी पाक वंशाच्या खासदाराला झापले, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमधील २००२ च्या दंगलींवर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बीबीसी) एक माहितीपट बनवलेला आहे. या माहितीपटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. हाच विषय पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी ब्रिटिश संसदेत आज मांडला. मोदींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी हुसैन यांना विरोध केल्याचे चित्र ब्रिटनच्या संसदेत पहायला मिळाले.

बीबीसीच्या अहवालावर इम्रान हुसैन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सुनक म्हणाले, ‘यूके सरकारची भूमिका स्पष्ट असते आणि दीर्घकालीन असते. त्यात कोणताही बदल झालेला नाही. छळवणूकीच्या घटना कोठेही घडत असल्या तरी आम्ही ते सहन करत नाही. पण आदरणीय खासदार ज्या प्रकारे हे सर्व प्रकरण सांगत आहेत, त्यावर माझा विश्वास नाही. मी त्यांच्याशी सहमत नाही.’ अशा शब्दात सुनक यांनी मत व्यक्त केले. (Rishi Sunak)

ऑस्ट्रेलियात मंदिरांची तोडफोड

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बागची यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियात नुकतीच काही मंदिरांची तोडफोड करण्यात आली. त्या घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो. ऑस्ट्रेलियन नेते, कम्युनिटी नेते आणि तिथल्या धार्मिक संघटनांनीही याचा जाहीर निषेध केला आहे. आमच्या मेलबर्नमधील वाणिज्य दूतावासाने या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली आहे. आम्ही दोषींविरुद्ध त्वरीत तपास आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. हे प्रकरण ऑस्ट्रेलियन सरकारकडेही नेण्यात आल्याचे, त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button