Telangana | कुत्र्याच्या हल्ल्यानंतर पहिल्या मजल्यावरुन उडी मारलेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

Telangana | कुत्र्याच्या हल्ल्यानंतर पहिल्या मजल्यावरुन उडी मारलेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन; पाळीव कुत्र्याने हल्ला केल्यानंतर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन जखमी झालेल्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. ही घटना तेलंगणाच्या (Telangana) हैदराबादमधील बंजारा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. मोहम्मद रिझवान (Swiggy delivery boy Rizwan)  असे त्या स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. तो डिलिव्हरी देण्यासाठी गेला असता पाळीव कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला आणि स्वतःची सुटका करुन घेण्याच्या प्रयत्नात त्याने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारली होती. त्याला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचारारम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. बंजारा हिल्स पोलिसांनी या प्रकरणी पाळीव कुत्र्याची मालकीण शोभना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, हैदाराबादच्या बंजारा हिल्स भागात राहणाऱ्या शोभना यांनी स्विगीवरुन फूड ऑर्डर केली होती. त्यासाठी डिलिव्हरी बॉय जेवण घेऊन त्यांच्या घरी पोहोचला होता. जेव्हा रिझवान शोभना यांना पार्सल देत होता त्यावेळी त्यांच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी तो छताच्या दिशेने धावला. यादरम्यान तो इमारतीवरुन खाली पडला. यात त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरु होते. त्याची प्रकृती चिंताजनक होती. दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बंजारा हिल्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझवान हा फूड डिलिव्हरीचे काम करत होता. तो बंजारा हिल्स येथील रोड नंबर ६ मधील लुम्बिनी रॉक कॅसल अपार्टमेंटमध्ये शोभना नावाच्या महिलेला फूड पार्सल देण्यासाठी आला होता. यादरम्यान त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला. गुरुवारी संध्याकाळी रिजवानचा भाऊ मोहम्मद खाजा यांच्या तक्रारीनंतर बंजारा हिल्स पोलिसांनी शोभना यांच्याविरुद्ध कलम ३३६ (निष्काळजीपणामुळे दुखापत) अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. (Telangana)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news