Odisha Stampede : कटकमधील मकर यात्रेत चेंगराचेंगरी; मुलांसह १२ जण गंभीर जखमी | पुढारी

Odisha Stampede : कटकमधील मकर यात्रेत चेंगराचेंगरी; मुलांसह १२ जण गंभीर जखमी

कटक; पुढारी ऑनलाईन : ओडिसातील कटकमध्ये भरलेल्या मकर यात्रेदरम्यान बंदाबा-गोपीनाथपूर येथील टी-ब्रिजवर गोंधळ निर्माण होऊन चिंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत लहान मुलांसह १२ हून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या गंभीर जखमीमध्ये दोन ते तीन लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यावेळी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. बदांबाच्या सिंह नाथ मंदिरामध्ये मकरसंक्रातींच्या निमित्ताने भाविकांची गर्दी उसळली होती. यादरम्यान हा अनुचित प्रकार घडला. (Odisha Stampede)

या दुर्घटनेबाबत अधिक माहिती देताना अथागडचे उपजिल्हाधिकारी हेमंत कुमार यांनी सांगितले की, मकर यात्रेत जवळपास २ लाखहून अधिक लोक ३ किलोमीटर लांब असणाऱ्या पुलावर आले होते. यामुळे पुलावर प्रचंड गर्दी झाली, यावेळी गोंधळ निर्माण होऊन चेंगराचेंगरी झाली. त्यांनी सांगितले की, गर्दीवर व निर्माण झालेल्या गोंधळावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. (Odisha Stampede)

कटकमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने मकर यात्रेचे बदांबा – गोपीनाथपुर या टी-पुलावर आयोजन केले गेले आहे. या यात्रेत येण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी ओसंडली आहे. त्यामुळे पुलावर एकावेळी प्रंचड गर्दी निर्माण झाल्याने गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १२ लोक गंभीर जखमी झाले असून याबाबतची अधिक माहिती घेतली जात आहे.


अधिक वाचा :

Back to top button