मनीष सिसोदियांच्या कार्यालयावर सीबीआयची धाड | पुढारी

मनीष सिसोदियांच्या कार्यालयावर सीबीआयची धाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सचिवालयातील कार्यालयावर आज ( दि. १४ ) ‘सीबीआय’ने धाड टाकली. या कारवाई नंतर सिसोदिया यांनी ट्वीट करीत ‘माझ्या विरोधात न काही मिळाले, ना काही मिळेल ‘ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

सीबीआय आज, पुन्हा माझ्या कार्यालयात पोहोचली आहे, त्यांचे स्वागत.त्यांनी माझ्या घरावर धाड टाकली, कार्यालयावर धाड टाकली, लॉकर ची शोधाशोध केली, माझ्या गावापर्यंत तपास केला. परंतु, माझ्या विरोधात न काही मिळाले, ना काही मिळेल. कारण मी काही चुकीच केलेल नाही, प्रामाणिकपणाने दिल्लीच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम केले आहे, अशी भावना सिसोदिया यांनी व्यक्त केली.

हेही वाचंलत का?

Back to top button