नाशिक, (देवगांव) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पहिने गावातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या निवृत्ती शिवराम डगळे यांच्या घराच्या अंगणातून बैल चोरून नेण्याची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे डगळे कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
त्र्यंबकेश्वर शहरापासून ३ किमी असलेल्या पहिने गावातील निवृत्ती शिवराम डगळे यांच्या अंगणातून पहाटे साडेतीन वाजता अज्ञात चोरट्यांनी पंधरा ते वीस हजार रुपयांचा घरच्या गायीचा खोंड चोरून पळविला. रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान अंगणात बांधलेल्या गायीला व तिच्यासोबत बांधलेल्या गोऱ्हाला वैरण टाकून झोपायला निघून गेले. मात्र, पहाटे लघुशंकेला उठलेल्या निवृत्ती डगळे यांना गायी जवळ बांधलेला गोऱ्हा दिसला नाही. सकाळी आजूबाजूला चौकशी केली. मात्र, तपास न लागल्याने बैलाची चोरी झाल्याचा संशय आला. याबाबत वाडीवर्हे कळविले असल्याचे निवृत्ती डगळे यांनी सांगितले.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जनावरे चोरीचे प्रमाण वाढले आहे. मात्र अज्ञात जनावरे चोरांचा टोळ्यांचा अद्याप मागमूस लागलेला नाही. त्यामूळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जनावरे चोरीच्या घटना घडत असल्याने जनावरांच्या चिंतेबरोबरच जनावरांअभावी शेती करावी कशी? असा प्रश्नही शेतक-यांसमोर उभा राहिला आहे. त्यात चोरीला गेलेल्या बैलामुळे आर्थिक विवनचनेत अडकलेल्या शेतकऱ्याचे असू कसे पुसले जाणार असा प्रश्न उभा ठाकला आहे.
हेही वाचा :